आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या 4 डीजे मालकांवर नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 

  
नळदुर्ग :- नळदुर्ग येथील नानीमाँ सरकार उर्स निमित्त काढण्यात आलेल्या संदल मिरवणुकीत डीजे /डॉल्बी सिस्टीम लावुन कर्णकर्कश आवाजामध्ये गाणी लावुन ध्वनी प्रदुषण करणाऱ्या 4 डीजे /डॉल्बीवर नळदुर्ग पोलिसांनी कारवाई करून डीजे /डॉल्बीच्या मालकांवर गुन्हा दाखल करुन डीजे /डॉल्बी जप्त केली आहे.पोलिसांच्या या दणक्याने डीजे/डॉल्बी चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या या कारवाईचे सर्व स्तरातुन स्वागत होत आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की.  25 जानेवारी रोजी नळदुर्ग येथे  नानीमाँ सरकार उर्स निमित्त संदल मिरवणुक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत टायगर/डीजे डॉल्बी मालक आन्ना बलभीम मोरे रा शहापुर ता. तुळजापुर, बकासुर डीजे /डॉल्बी मालक महादेव दादासाहेब उंचावळे रा शहापुर ता. तुळजापुर, एच. आर. ऑडिओ डीजे / डॉल्बी मालक शाहाबाज हनीफ रंगरेज रा सोलापुर व जे. जे. साऊंड डीजे / डॉल्बी मालक विशाल दत्तात्रय फुलजयंतीवाले रा. सोलापुर यांनी संदल मिरवणुकीत डीजे / डॉल्बी सिस्टीम लावुन कर्णकर्कश आवाजामध्ये गाणी लावुन मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदुषण केल्याने तसेच पोलिसांनी त्यांना वेळोवेळी आवाज कमी करण्याबाबत सुचना देऊनही त्या सुचनांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या ताब्यातील डीजे / डॉल्बी वाहन अरुंद रस्त्याने गर्दीच्या ठिकाणावरून दिलेल्या शर्थी व अटींचे उल्लंघन करुन मोठ्या प्रमाणात डीजे /डॉल्बी सिस्टीम लावुन मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदुषण केल्यामुळे नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन यादव यांच्या आदेशानुसार व सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकिशोर पंडीतराव सोळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी आन्ना बलभीम मोरे रा. शहापुर, महादेव दादासाहेब उंचावळे रा शहापुर, शाहाबाज हनीफ रंगरेज रा. सोलापुर व विशाल दत्तात्रय फुलजयंतीवाले यांच्याविरोधात गुरनं. 36/2026 कलम भारतीय न्याय संहिता कलम 223,281,289,292,293,सह प्रयावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 315 व ध्वनी प्रदुषण अधिनियम 2000 चे कलम 3,4,5,6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे कायदा धाब्यावर बसवुन कर्णकर्कश आवाजात गाणी लावुन ध्वनी प्रदुषण करणाऱ्या डीजे / डॉल्बी चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या या कारवाईचे सर्वस्तरातुन कौतुक होत आहे.यापुढील काळातही पोलिसांनी कर्णकर्कश आवाजात गाणी लावुन ध्वनी प्रदुषण करणाऱ्या डीजे / डॉल्बी चालकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post