नळदुर्ग येथे सामुदायिक विवाह सोहळ्यात 14 जोडपी विवाहबद्ध

नळदुर्ग:- येथील नळदुर्ग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने 25 जानेवारी रोजी पार पडलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात 14 जोडपी विवाहबद्ध झाली येथील बीके फंक्शन हॉलमध्ये हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. नळदुर्ग येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या नळदुर्ग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही इज्तेमाई शादियाँ( सामुदायिक विवाह) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या 11 वर्षापासून मुस्लिम समाजासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे गोरगरीब गरजूवंत कुटुंबीयांना मोठ्या प्रमाणात आधार मिळत आहे. संस्थेच्या वतीने मागील 11 वर्षात 170 हून अधिक जोडप्यांचे विवाह लावण्यात आले आहेत. रविवारच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झालेल्या नववधूवरांना नळदुर्ग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने प्रत्येकी 25 हजार रुपयांचे संसारोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे.अलै वेल्फेअर सोसायटी चे प्रमुख सय्यद नादेरउल्ला हुसेनी यांच्या मार्गदर्शना खाली हाफेज व खारी सय्यद मैनोद्दीन जागीरदार,आलेम मोहम्मद रजा, हाफेज सय्यद नियामतूल्ला इनामदार,हाफेज फारुक अहेमद शेख,हाफेज फुरफान नक्शबंदी,हाफेज शफिक रजा, हाफेज  मुदस्सर कुरेशी,हाफेज कैसरपाशा जागीरदार , हाफेज इमरान शेख, हाफेज शब्बीर अहेमद शेख,हाफेज खादर इनामदार,शहर काजी मैनोद्दीन काजी यांच्यासह शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक पत्रकारिता व पोलीस प्रशासनातील मान्यवरांसह सर्व जाती धर्मातील नागरिक उपस्थित होते. विवाह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी नळदुर्ग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष लतीफ शेख यांच्यासह रुकनोद्दीन शेख, युनुस शेख, अफरोज पंचभाई,अँड मतीन बाडेवाले, बरकतउल्ला जाहगीरदार,आमेर शेख, खालेद इनामदार, सादेक काजी, वसीम कुरेशी, आबेद इनामदार, शौकत कुरेशी, हाजीमलंग शेख, नसीर पटेल, सैफन शेख, रफिक फुलारी, फैयाज पटेल,अशपाक कुरेशी, अबुबकर कुरेशी,समदानी कुरेशी,अलीम शेख, जाकीर पटेल, समीर बाडेवाले,गौस इनामदार,खमर कुरेशी,शमा काजी, मुर्तुजा मौजन, रहेमान कुरेशी, सज्जाद सावकार,  हुजूर शेख, सरफराज बागवान, सलामत टीनवाले,  मोहसीन बाडेवाले, वसीम पठाण, मुर्तुजा शेख, वाहेद शेख, मोहसीन इनामदार,निजाम बागवान, रियाज पटेल,इयाज काजी, मुजाहिद मौजन, यांच्यासह धाराशिव येथून आलेले हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहै अलै वेल्फेअर सोसायटीचे मित्रपरिवार, बांधकाम कामगार संघटना नळदुर्ग तसेच  शहरातील विविध सामाजिक क्षेत्रातील संघटनांनी  परिश्रम घेतले. या सामुदायिक विवाह सोहळ्यात सर्वच जाती धर्मातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post