नळदुर्ग :-- दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सध्या प्रचाराला वेग आला असून गाठीभेटी सोबत डिजिटल प्रचारावर उमेदवारांनी भर दिल्यामुळे सध्या सोशल मीडियावर प्रचाराचा धुराळा सुरूच आहे. या निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय नेत्याने सावध भूमिका घेत आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी सोशल मीडियाचा वापर जास्तीत जास्त पद्धतीने कसं होईल यावर भर दिल्यामुळे व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया साइटवर कार्यकर्त्यांनी त्याने पाऊस सुरू केला आहे. त्यात काही जण स्थानिक मुद्द्यांना प्रधान्य दिला आहे तर काहीजण आश्वासनाची खैरात करत निवडून आल्यानंतर शहराचा सर्वांगीण विकास करून चेहरा मोहरा बदलण्याची गवाही देत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर काहीजण डिजिटल प्रचारासाठी खास स्पेशल सोशल मीडिया टीम प्रचारात उतरवली आहे त्यामुळे प्रत्यक्ष भेटीपेक्षा डिजिटल प्रचाराकडे सर्वच पक्षाचे राजकीय नेत्यांचे कल असल्याचे यावरून दिसून येत आहे प्रचारासाठी वेळ कमी असल्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे अशक्य असल्याने या युक्तीचा वापर केल्याचे यावरून स्पष्ट दिसून येत आहे. नळदुर्ग नगराध्यक्ष पदासाठी महायुती व महाविकास आघाडीमध्ये एकमत न झाल्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एम आय एम व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यामुळे यावेळी होणाऱ्या या निवडणुकीत सर्वच दिग्गज उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे ही निवडणूक अटीतटीचे होण्याची शक्यता आहे. प्रचाराचा कालावधी कमी असल्यामुळे दररोज सकाळी एक दोन व संध्याकाळी एक दोन प्रभागात पदयात्रा करून त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप वर एका स्पर्धा सुरू झाल्यामुळे व्हाट्सअप ग्रुप हँग होत आहेत त्यामुळे या निवडणुकीत सोशल मीडियाचा किती वापर केला जात आहे याचा अंदाज आहे यावरून येत आहे. या निवडणुकीत रिंगणात उतरलेल्या उमेदवारांमध्ये काही तरुणांचा समावेश असल्यामुळे सोशल मीडियाचा वापर जास्तीत जास्त करून लोकापर्यंत पोहोचण्याचा ट्रेंड सध्या जोरात सुरू आहे त्यामुळे ही निवडणूक जमिनीवर कमी सोशल मीडियावर जास्त लढली जात असल्याचे यावरून दिसून येत आहे. 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आखाड्यात गुडघ्याला बाशिंग बांधून सहा उमेदवार असले तरी या निवडणुकीत चौरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याकरिता सध्या जोरात प्रचार सुरू आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्ट मतदारावर कितपत छाप सोडतात हे निवडणुकी नंतर करणार आहे मात्र सध्या तरी सोशल मीडियावर सर्वच पक्षाचे नेते कार्यकर्ते सक्रिय झाल्यामुळे ही निवडणूक डिजिटल निवडणूक झाली आहे.
