नळदुर्ग :- विकासाचे मारेकऱ्यांना निवडणूक आली म्हणून आता आमची आठवण झाली का पाच वर्षे कुठे होतो.विकास का झाले नाही याचा अगोदर उत्तर द्या त्यानंतरच मतदान मागा तुम्हाला मतदान मागण्याचा अधिकार आहे का याचा देखील थोडासा विचार करा असं संतप्त प्रश्न मतदारांकडून उमेदवारांना होत असल्यामुळे प्रचारासाठी जनतेच्या दरबारात आलेल्या उमेदवारांची बोलती बंद झाली आहे. सध्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचार अंतिम टप्प्यात असून उमेदवार मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन प्रचाराचा सपाटा लावला आहे हे करत असताना काही चांगले तर काही वाईट अनुभव येत आहेत. त्यात प्रमुख्याने जनतेच्या दरबारात गेल्यानंतर विकास शहराचा का झालं नाही याची विचारणा मोठ्या प्रमाणात होत आहे. कारण नळदुर्ग शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधी रुपये निधी दिल्याचे नेते प्रचार सभेत बोलत आहेत.मात्र आलेल्या निधीतून किती कामे पूर्ण झाली हा प्रश्न नळदुर्गकरांचा आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पाणीपुरवठ्यासाठी 46 कोटीची अमृत 2.0 तसेच रस्त्यांच्या कामासाठी 93 कोटी व शहरातील इतर कामे मार्गी लागावी यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आला आहे ते जवळपास दीडशे कोटीच्या घरात आहे. मात्र आज देखील अमृत 2.0 या पाणीपुरवठा योजनेचे काम अपूर्ण आहे तर रस्त्यांची कामे शहरात होणे अपेक्षित असताना शहराच्या बाहेर लोक वस्ती नसलेल्या ठिकाणी होत आहेत त्याचबरोबर स्वच्छते साठी महिन्याला आठ लाख रुपये खर्च करून सुद्धा शहरातील अनेक भागात कचऱ्याचे खच पडले आहेत. तसेच अनेक विकास कामे अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे नागरिकात संतप्त व्यक्त केला जात आहे कारण ही दोन मोठे कामे सोडल्यानंतर उरलेले इतर कामांसाठी निविदा प्रक्रिया झाल्यानंतर दीड महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतर सुद्धा कामे सुरू झालेले नाहीत ते का सुरू झाले नाहीत याला अनेक कारणे आहेत. त्यात शहरातील काही मलिदा लाटणाऱ्या कार्यकर्त्यांनी रोखून ठेवले असल्याची चर्चा शहरात मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे नागरिकात नकारात्मक मेसेज जात आहे. त्यामुळे एखादा उमेदवार किंवा नेता तो कोणत्याही पक्षाचा असो प्रचारासाठी आला की त्याला पहिला प्रश्न विकास कामे का केली जात नाहीत पाण्याचा प्रश्न कोणी सोडविणार?रस्ता कोणी बनवून देणार?स्वच्छता कशी होणार? तरुणांना रोजगार मिळणार का? आज पर्यंत हा प्रश्न का मार्गी लागला नाही अशा अनेक प्रश्नांची सरबती येणाऱ्या नेत्यांवर केली जात आहे त्यामुळे प्रचारापेक्षा विचारणा जास्त होत असल्यामुळे नेत्यांनी प्रत्यक्ष गाठीभेटी व पदयात्रापेक्षा सोशल मीडियावर प्रचाराला जास्त प्रधान्य दिले आहेत. त्या ठिकाणी देखील नेत्यांची सुटका होत नसल्याचे दिसून येते. कारण एखादी पोस्ट व्हायरल झाली की त्याच्यावर कमेंटचा महापूर येत आहे त्यामुळे नगरपालिकेचे या निवडणुकीत नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.