नळदुर्ग :- नळदुर्ग नगरपालिकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत नगरपालिकेच्या स्थापनेच्या 69 वर्षानंतर प्रथमच नगराध्यक्ष पदासह एकूण 12 जागा फडकावत नगरपालिकेवर भाजपचा भगवा फडकला आहे. या निवडणुकीत भाजपचे बसवराज धरणे यांनी एमआयएमचे शहेबाज काझी यांचा 422 मतांनी पराभव करून इतिहास रचला आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे अशोक जगदाळे यांच्यासह पाच माजी नगराध्यक्षांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत महायुतीचे 11 व काँग्रेसचे 9 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यात प्रभाग क्रमांक 1 (अ) मधून भाजपचे छम्माबाई राठोड यांनी 435 मतदान घेऊन सुशीला जाधव यांचा 74 मतांनी तर भाजपचे प्रभाग क्रमांक 1( ब )मधून भाजपचे निरंजन राठोड यांनी 484 मतदान घेऊन काँग्रेसचे दत्ता राठोड यांचा 4 मतांनी पराभव केला. तर प्रभाग क्रमांक 2 (अ) मधून काँग्रेसचे मारुती खारवे यांनी 565 मतदान घेऊन सेनेचे शंकर वाघमारे यांचा 143 मतानी तर प्रभाग क्रमांक 2(ब) मधून सेनेच्या सुमन ठाकूर यांनी 569 मतदान घेऊन काँग्रेस च्या मुशेराबी शेख यांचा 5 मतांनी पराभव केला. तर प्रभाग क्रमांक 3(अ) भाजपचे दत्तात्रय दासकर यांनी 493 मतदान घेऊन काँग्रेसचे नितीन कासार यांचा 100 मतांनी तर प्रभाग क्रमांक 3 (ब) मधून मीनाक्षी काळे यांनी 594 मतदान घेऊन सुमन जाधव यांचा 336 मतानी पराभव केला. तर प्रभाग क्रमांक 4(अ) मधून काँग्रेसचे अपर्णा बेडगे यांनी 367 मतदान घेऊन भाजपच्या सुरेखा बेडगे यांचा 75 मतानी तर प्रभाग क्रमांक 4 (ब) मधून काँग्रेसचे आकाश कुलकर्णी यांनी 376 मतदान घेऊन भाजपचे सुशांत भूमकर यांचा 12 मतांनी पराभव केला. तर प्रभाग 5( अ) मधून भाजपचे तानाजी जाधव यांनी 486 मतदान घेऊन एमआयएमचे शहेबाज काझी यांचा 45 मतानी तर प्रभाग 5 (ब )मधून भाजपच्या राणी सुरवसे यांनी 439 मतदान घेऊन अपक्ष काझी इलयाज बेगम यांचा 19 मतानी पराभव केला. प्रभाग क्रमांक 6(अ) मधून भाजपचे रिजवान काझी यांनी 379 मतदान घेऊन काँग्रेसचे सय्यद मुजतबा यांचा 45 मतानी तर प्रभाग 6 (ब) मधून काँग्रेसच्या मन्नाबी कुरेशी यांनी 405 मतदान घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तयबा कदरी यांचा 1 मतांनी पराभव केला. तर प्रभाग क्रमांक 7( अ )मधून काँग्रेसचे गफूर कुरेशी यांनी 822 मतदान घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुस्ताक कुरेशी यांचा 308 मतानी तर 7(ब) मधून काँग्रेसच्या झुलेखा बेगम इनामदार यांनी 798 मतदान घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस च्या शहनाज बेगम यांचा 255 मतांनी पराभव केला. तर प्रभाग 8(अ)मधून काँग्रेसचे इमाम शेख यांनी 418 मतदान घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजहर जागीरदार यांचा 44 मतांनी पराभव केला. तर प्रभाग 8( ब )मधून काँग्रेसचे कमल गायकवाड यांनी 443 मतदान घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संगीता गायकवाड यांचा 123 मतांनी पराभव केला. तर प्रभाग क्रमांक 9 (अ )मधून भाजपचे शशिकांत पुदाले यांनी 393 मतदान घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खालीद इनामदार यांचा 75 मतांनी तर प्रभाग क्रमांक 9 (ब) मधून काँग्रेसच्या मदिना बागवान यांनी 401 मतदान घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगल सुरवसे यांचा 92 मतांनी पराभव केला. तर प्रभाग क्रमांक 10(अ) मधून भाजपचे नय्यर पाशा जहागीरदार यांनी 610 मतदान घेऊन काँग्रेसचे शंकर पुदाले यांचा 367 मतांनी तर प्रभाग क्रमांक 10( ब )मधून साक्षी नळदुर्गकर यांनी 524 मतदान घेऊन काँग्रेसच्या अनिता राणे यांचा 107 मतांनी पराभव केला. ही निवडणूक सुरळीत पार पडण्याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद गायकवाड सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रामकृष्ण जाधवर, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके, आनंद कांगणे,पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे, संतोष गीते यांच्यासह पोलीस व नगरपालिका प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले.
*************************** या निवडणुकीमध्ये माजी नगराध्यक्ष शहेबाज काझी, मुस्ताक कुरेशी, नितीन कासार, मंगल सुरवसे व मुनवर सुलताना कुरेशी या 5 माजी नगराध्यक्षांचा पराभव झाला आहे.
************************** सुरुवातीला ही निवडणूक भाजपचे बसवराज धरणे व काँग्रेस पक्षाचे अशोक जगदाळे यांच्यात होणार असे दिसत होते मात्र तिकीट न मिळाल्यामुळे काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देत एमआयएम च्या वतीने शहेबाज काझी यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे ही निवडणूक तिरंगी झाली. व काँग्रेसचा हक्काचा मतदान म्हणून ओळख असलेल्या मुस्लिम समाजाने या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात एमआयएमच्या पाठीशी गेल्यामुळे त्याचा फटका काँग्रेस पक्षाचे अशोक जगदाळे यांना या निवडणुकीत झाल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले आहे
**************************
नळदुर्ग नगराध्यक्ष पदासाठी एकूण सहा उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. मात्र निवडणूक ही तिरंगी झाली त्यात निवडणुकीत भाजपचे बसवराज धरणे यांनी एमआयएमचे शहेबाज काझी यांचा 422 मतानी पराभव करून नगराध्यक्ष पदासाठी विजयी झाले. भाजपचे बसवराज धरणे यांना 4331 मतदान पडले तर एमआयएम चे शहेबाज काझी यांना 3911 पडले तर काँग्रेस पक्षाचे अशोक जगदाळे यांना 2961 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संजय बताले यांना 1106 मतदान पडले. ही निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस होणार अशी चर्चा होती. मात्र ही निवडणूक भाजप विरुद्ध एमआयएम अशी झाली. त्यात भाजपचे बसवराज धरणे यांनी शहेबाज काझी यांचा पराभव केला.
****************************
