नळदुर्ग:- महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग पुरातत्त्व वस्तुसंग्रहालये संचालनालय मुंबई, विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर आणि कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग ता तुळजापूर जि धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने “ जागतिक वारसा सप्ताह “नळदुर्ग किल्ला या ठिकाणी ग्रीन क्लब, राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्रसेना विभागाच्या वतीने किल्ल्यातील स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेद्वारे ऐतिहासिक वास्तूच्या ठिकाणी कचरा करू नये व वास्तु परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या दृष्टीने प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्याचे कार्य या उपक्रमाद्वारे महाविद्यालयाद्वारे करण्यात आले तसेच पुरातत्त्वस्त्राचे महत्व समजून घेणे व त्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासंदर्भात महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामार्फत जनजागृती करण्यात आली.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमांमध्ये ग्रीन क्लब समन्वयक प्रा उद्धव भाले, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा दादासाहेब जाधव ,प्रा बाबासाहेब सावते , प्रा धनंजय चौधरी,प्रा डॉ विजय सावंत प्रा डॉ हशमबेग मिरझा , प्रा डॉ अशोक कदम, प्रा डॉ तुळशीराम दबडे, प्रा डॉ सुभाष जोगदंडे , प्रा डॉ दीपक जगदाळे प्रा डॉ कपिल सोनटक्के, प्रा सज्जन देव्हारे, प्रा डॉ जयश्री घोडके, प्रा उषा बदने, प्रा रोहित गायकवाड, प्रा बालाजी गायकवाड,बारीक शिंदे , सुरेश गायकवाड , हमीद काझी , सिद्ध सुतार, किरण व्हंताळकर हे उपस्थित राहून किल्ल्यातील स्वच्छता अभियानात सहभाग नोंदविला. तसेच नळदुर्ग किल्ल्यातील कर्मचारी श्री जयभीम वाघमारे कंत्राटी कामगार यांनी नळदुर्ग किल्ल्यातील पुरातत्त्व विभागाविषयी संपूर्ण माहिती दिली. तसेच या मोहिमेमध्ये अन्य किल्ल्यातील कामगार व ४० पेक्षा जास्त विध्यार्थी विद्यार्थीनी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहुन किल्यातील बऱ्याच प्रमाणात कचरा व प्लास्टीक गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
