नळदुर्ग :- नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी 17 नोव्हेंबर रोजी 111 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्वाचन अधिकारी प्रमोद गायकवाड व रामकृष्ण जाधवर दाखल केले. 17 नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवट दिवस असल्यामुळे नगरपालिकेच्या आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे 17 नोव्हेंबर पर्यंत एकूण 189 उमेदवारांनी आपली अर्ज दाखल केले आहे. त्यापैकी काँग्रेस पक्षाचे अशोक जगदाळे, भाजपचे बसवराज धरणे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संजय बताले, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे महेबूब शेख, एआयएमआयएम पक्षाचे शहेबाज काजी, अपक्ष मुजम्मिल शेख यांच्यासह एकूण 16 जणांनी नगराध्यक्ष पदासाठी तर 173 जणांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महायुती व महाविकास आघाडीतील शिंदेसेना वगळता सर्वच पक्षांनी नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवार उभा केल्यामुळे तुल्यबळ लढत होण्याची शक्यता निर्माण झाली.

Mim only
ReplyDelete