नळदुर्ग :- दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या नळदुर्ग नगरपरिषदची सार्वत्रिक निवडणूक 2025 सुरळीत पार पाडण्याकरिता नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण 25 नोव्हेंबर रोजी येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेतील सभागृहात उत्साहात पार पडला. या प्रशिक्षणाची सुरुवात अप्पर तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रामकृष्ण जाधवर मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी उपस्थित केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मार्गदर्शन केले. मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांच्या या प्रशिक्षणामध्ये ईव्हीएम मशीन हाताळणी, मतदान पत्रिकेचे वेळे पत्रक,मतदान अधिकाऱ्यांची जबाबदारी,मतदान केंद्रावरील कागदपत्रांची पूर्तता, मतदान सुरू असताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी 20 मतदान केंद्राध्यक्ष तसेच 125 मतदान अधिकारी उपस्थित होते. यापूर्वी पहिले प्रशिक्षण 20 नोव्हेंबर रोजी झाले होते त्यावेळी देखील मोठ्या प्रमाणात मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी उपस्थित होते. पुढील तिसरे प्रशिक्षण 29 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
