नळदुर्ग :- नळदुर्ग येथील इंदिरानगर येथे मारुती मंदिर शेजारील सभागृह बांधकामाचा भूमिपूजन सोहळा नुकतेच संपन्न झाला. या भूमिपूजन कार्यक्रमाची सुरुवात रेणुकामाता मंदिरात देवीची पूजा करून झाली. त्यानंतर मारुती मंदिरात पूजा विधी पार पाडून भूमिपूजन करण्यात आले.या प्रसंगी जेष्ठ नागरिक घोडके शशिकांत शिवराम, गुलाब शिंदे, शशिकांत व्हटकर, बाबू कासार, बाबू सुरवसे, बेबाबाई जाधव, किशोर घोडके, सचिन घोडके, सचिन शिंदे, रोहेश माने, बालाजी सुरवसे, आनंद सुरवसे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंदिरा नगर येथे या सभागृहाच्या उभारणीमुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांना सामाजिक कार्ये, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी मदत होणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
