नळदुर्ग :- धाराशिव येथील जिल्हा क्रीडा क्रीडा जिम्नॅस्टिक प्रशिक्षण केंद्र येथील खेळाडू गार्गी मुळे हिने नागपूर येथे पार पडलेल्या शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेत 17 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर दरम्यान 14 वर्षे मुली वयोगटात सहभाग नोंदवला. व नांदेड येथे झालेल्या विभागीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेत गार्गी मुळे सोबत वेदांत आहेर व श्रावणी वाघमारे या खेळाडूंनीही सहभाग नोंदवला . त्यापैकी गार्गी मुळे ही विभागीय स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून नागपूर येथील जिम्नॅस्टिक्स राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.हे खेळाडू जिल्हा जिम्नॅस्टिक क्रीडा प्रशिक्षण केंद्रात नियमित सराव करत आहेत. त्यांना राज्य क्रीडा मार्गदर्शक जिम्नॅस्टिक श्रीमती डिंपल ठाकरे यांचे प्रशिक्षण लाभले आहे. तिच्या गार्गी मुळे याच्या या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे तालुका क्रीडा अधिकारी बी. के. नाईकवाडी तालुका क्रीडा अधिकारी गणेश पवार यांच्यासह मित्रपरिवारांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
