विकासाच्या मुद्द्यावर नगरपालिकेची निवडणूक लढविणार :- शफी भाई शेख

 

नळदुर्ग :- विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही नळदुर्ग नगरपालिकेची निवडणुक पुर्ण ताकदीनीशी लढवित असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष शफीभाई शेख यांनी नळदुर्ग येथे आयोजित केलेल्या पत्रकार परीषदेत बोलतांना सांगितले आहे. नळदुर्ग नगरपालिकेची निवडणुक 2 डिसेंबर रोजी होत आहे. सध्या सर्वच पक्षांनी आपापल्या उमेदवारांचा प्रचार सुरु केला आहे. त्यामुळे नळदुर्ग शहरातील वातावरण पुर्णपणे राजकीय झाले आहे.19 नोव्हेंबर रोजी नगरपालिका निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची पत्रकार परीषद पार पडली. या पत्रकार परीषदेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष शफीभाई शेख. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय बताले, अझहर जागीरदार  अजित जुनैदी, रमेश पिस्के, योगेश सुरवसे, प्रमोद कुलकर्णी   व पक्षाचे सर्व उमेदवार उपस्थित होते. यावेळी बोलतांना शफीभाई शेख यांनी म्हटले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नळदुर्ग शहराच्या विकासाचा मुद्दा घेऊन नळदुर्ग नगरपालिकेची निवडणुक लढवित आहोत. आम्ही जातीच्या किंवा धर्माच्या आधारावर ही निवडणुक लढवित नाही. तर आमच्या पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली फक्त आणि फक्त विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहोत. आज ऐतिहासिक नळदुर्ग शहराची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. शहरात स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा, दिवाबत्ती आणि इतर मुलभुत सविधेचा पार बोजवारा उडाला आहे. ज्यांनी शहराची अशी अवस्था केली तीच मंडळी आज आमच्यसमोर निवडणुक रिंगणात आहेत. आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार हे चोवीस तास जनतेसाठी उपलब्ध असणारे आहेत.ज्यांना नळदुर्गकरांनी मोठ्या विश्वासाने पाच वर्षे नगरपालिकेची सत्ता दिली त्यांनी शहराची पुर्ती वाट लावुन टाकली आज तीच व्यक्ती नगरध्यक्ष पदाची निवडणुक लढवित आहेत ही हस्यास्पद बाब आहे असे शफीभाई शेख यांनी म्हटले आहे. आमचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीच्या धर्तीवर ऐतिहासिक नळदुर्ग शहराचा विकास करण्याचा आमचा मानस आहे. आमचा पक्ष शाहु-फुले-आंबेडकर व मौलाना आझाद यांच्या विचारसरणीवर चालणारा पक्ष आहे. आज नळदुर्ग शहरातील रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे याला जबाबदार कोण? आज शहरात बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. युवकांच्या हाताला काम मिळावे यासाठी अजित पवार यांच्या माध्यमातुन शहरात एमआयडीसी उभारण्याबरोबरच उद्योगधंदे सुरु करुन त्यामध्ये भुमीपुत्रानाच काम मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. असेही शफीभाई यांनी म्हटले आहे.जनतेने मला नराध्यक्ष म्हणुन निवडुन दिले तर सध्या नळदुर्ग शहराची शासन दरबारी अतिसंवेदनशिल शहर म्हणुन असणारी नोंद पुसली जावी यासाठी मी सर्वप्रथम काम करणार असल्याचे संजय बताले यांनी म्हटले आहे. मी नगराध्यक्ष झालो तर नगरपालिकेचा कारभार हा नळदुर्गमधुनच चालेल. मी रबरी स्टॅम्प म्हणुन काम करणार नसल्याचेही संजय बताले यांनी पत्रकार परीषदेत बोलतांना म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post