अणदुर जवळ क्रुझर उलटून 3 महिला ठार 11 जखमी

 नळदुर्ग :-  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 सोलापूर हैदराबाद रोडवरील अणदुर येथील नॅशनल धाब्याजवळ क्रुझर गाडीचा  टायर फुटल्यामुळे दुभाजकावर उलटल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये देवदर्शनासाठी निघालेले तीन महिला  जागीच ठार तर 11 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे.हा अपघात 22 नोव्हेंबर रोजी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास अणदुर घडला आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की  चा  सोलापूर हुन हैदराबाद कडे देवदर्शनासाठी निघालेल्या MH-24 B-4948  ही क्रुझर गाडी अणदुर येथील चिवरीजवळील  नॅशनल धाब्याजवळ  गाडीचा समोरील टायर फुटून क्रुझर  गाडी दुभाजकावर उलटल्याने  झालेल्या भीषण अपघातामध्ये पूजा हरी शिंदे वय 30 वर्ष  रा. सोलापूर उळे, सोनाली माऊली कदम वय 23 वर्ष  व साक्षी बडे रा.हडपसर पुणे या महिला मयत झाले आहेत. तर 11 गंभीर जखमी झाले आहेत   जखमीचे नाव 1) कार्तिकी रवींद्र आमराळे  वय 14 वर्ष  2) आकाश कदम वय  25 वर्ष   3) माऊली दत्तात्रय कदम वय28  4) अंजली रवींद्र आमराळे  वय 31 वर्ष  5) कुणाल लक्ष्मण भिसे वय 25 वर्ष  6) शिवांश मारुती कदम वय 1 वर्ष    7) ओमकार हरी शिंदे वय 12 वर्ष  8) रुद्र हरी शिंदे वय  11 वर्ष   9) श्लोक हरी शिंदे वय 8 वर्ष  10) बालाजी पांडुरंग शिंदे वय 47 वर्ष 11) हरी बाळकृष्ण शिंदे वय 33 सर्व रा. हडपसर पुणे जखमींची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच नळदुर्ग पोलीस ठाणे व नळदुर्ग  महामार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहचून  या अपघातातील जखमींना  नळदुर्ग  येथील जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्थान नानिज धाम ची रुग्णवाहिका बोलवून  घेऊन प्रहार सोलापूर जिल्हा वैद्यकीय मदत कक्ष अध्यक्ष महमद पठाण  यांनी  उपजिल्हा रुग्णालय नळदुर्ग येथे दाखल केले. उपजिल्हा  रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ चंचल बोडके,वैद्यकीय अधिकारी डॉ सुरेंद्र मडके,डॉ प्रांजली कांबळे,डॉ दिपक चव्हाण यांनी जखमींवर  प्राथमिक उपचार करून सोलापूर येथे पुढील उपचारासाठी पाठविले आहेत. जखमी पैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

Post a Comment

Previous Post Next Post