तानाजी जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल

 


नळदुर्ग :- नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्र. 5 मधुन पत्रकार तानाजी जाधव यांनी 15 नोव्हेंबर रोजी भाजपकडुन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.नळदुर्ग नगरपालिकेची निवडणुक  2डिसेंबर रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख दि. 17 नोव्हेंबर ही आहे. येणाऱ्या दोन दिवसात मोठया संख्येने उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. अजुन प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत. त्याचबरोबर नगराध्यक्ष पदासाठीही एक अपक्ष वगळता कुठलाच उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.नगरपालिका निवडणुकीसाठी  निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन नळदुर्गचे अप्पर तहसिलदार प्रमोद गायकवाड तर सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन नळदुर्ग नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर व धाराशिव तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदार घृष्णेश्वर स्वामी हे काम पाहत आहेत.15 नोव्हेंबर रोजी नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्र. 5 मधील सर्वसाधारण पुरुष गटासाठी राखीव असलेल्या जागेवर पत्रकार तानाजी जाधव यांनी भाजपकडुन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्या सोबत माजी नगरसेवक सुधीर हजारे, सुहास येडगे, पांडुरंग गायकवाड,विलास येडगे, युवराज जगताप, सहदेव जगताप, प्रशांत पवार,, पिंटु काळे, गणेश येडगे, लिंबराज पवार, अविनाश जाधव, शशिकांत बेले, महेश जाधव आदीजन उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post