राजगुरू श्री ष. ब्र. 108 शिवलिंगेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचा पुण्यस्मरणोत्सव सोहळा संपन्न



नळदुर्ग :- नळदुर्ग येथे 12 नोव्हेंबर रोजी सुक्षेत्र नळदुर्ग राजगुरू श्री शिवलिंगेश्वर हिरेमठाचे निर्विकल्प समाधीस्त राजगुरू श्री ष. ब्र. 108 शिवलिंगेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचा पुण्यस्मरणोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व विविध धार्मिक कार्यकमाने पार पडला.
  सालाबादाप्रमाणे याहीवर्षी नळदुर्ग येथील राजगुरू श्री शिवलिंगेश्वर हिरेमठ येथे या मठाचे मठाधीपती श्री ष. ब्र. बसवराज शिवाचार्य महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली 6 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत सुक्षेत्र नळदुर्ग येथील राजगुरू श्री शिवलिंगेश्वर हिरेमठाचे निर्विकल्प समाधीस्त राजगुरू श्री ष. ब्र. 108 शिवलिंगेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचा पुण्यस्मरणोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व विविध धार्मिक कार्यक्रमाने पार पडला. 6 ते 11 नोव्हेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी 5.30 ते 6.30 या वेळेत व्याख्यान केसरी वे. प. सोमनाथ स्वामी धोत्री यांच्या रसाळ वाणीतुन अध्यात्मिक प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला. या प्रवचनासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत होते.
 पुण्यसमरणोत्सव सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम  12 नोव्हेंबर रोजी पार पडला. यावेळी सकाळी 6 वाजता महाअभिषेक आणि दीक्षा अय्याचार हा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर सकाळी 10 वाजता राजगुरू श्री शिवलिंगेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचा पुण्यस्मरणोत्सव आणि धर्मसभा पार पडली. या कार्यक्रमास श्री म. नी. प्र. राजशेखर महास्वामीजी विरक्त मठ नंदगाव, श्री म. नी. प्र. जयशांतीलिंग महास्वामीजी विरक्त मठ हिरेनागाव, श्री ष. ब्र. सुरतेश्वर शिवाचार्य महास्वामीजी हिरेमठ अचलेर,श्री. म. नी. प्र. शंकर राजेंद्र महास्वामीजी गच्चीन मठ अमीनगड, श्री म. नी. प्र. मुरुघेंद्र महास्वामीजी सोमशेखर मठ मुनवळळी, श्री. म. नी. प्र. शिवबसवराजेंद्र महास्वामीजी विरक्त मठ खेडगी, श्री. ष. ब्र. शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी निळकंठेश्वर हिरेमठ अणदुर, श्री. म. नी. प्र. गंगाधर महास्वामीजी विरक्त मठ जेवळी,श्री. ष. ब्र. जयमल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी नारळ मठ मुरूम, श्री म. नी. प्र. अभिनव शिवलिंग महास्वामीजी विरक्त मठ मादनहिप्परगा,श्री. म. नी. प्र. विरंतेश्वर महास्वामीजी विरक्त मठ केसरजवळगा, श्री ष. ब्र. बसवराज शिवाचार्य महास्वामीजी राजगुरू श्री शिवलिंगेश्वर हिरेमठ नळदुर्ग हे उपस्थित होते. प्रारंभी सर्व महास्वामीजींचा सत्कार करण्यात आला.यानंतर महास्वामीजीनी उपस्थित भक्तांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर यावेळी अणदुरचे सरपंच रामचंद्र आलुरे, विनायक अहंकारी, राजेंद्र स्वामी यांचेही भाषणे झाली. शेवटी श्री. ष. ब्र. बसवराज शिवाचार्य महास्वामीजी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमानंतर भाविकांना माजी नगराध्यक्ष दत्तात्रय दासकर यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन माजी नगरसेवक दत्तात्रय कोरे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री ष. ब्र. बसवराज शिवाचार्य महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक बसवराज धरणे, दयानंद स्वामी, महेश कोप्पा पाटील, ज्योतिर्लिंग बचाटे, बंडप्पा कसेकर, संतोष वाले,  अनिल स्वामी यांच्यासह सर्वांनी परीश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post