सज्जनगडावरील श्री समर्थ रामदासांच्या पादुका दर्शनासाठी गर्दी

 

नळदुर्ग :- नळदुर्ग शहरात पहिल्यांदाच श्रीक्षेत्र सज्जनगड येथील श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या पादुकांचे आगमन झाले होते या पवित्र पादुकांचे दर्शन घेण्यासाठी शहरातील नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.12 नोव्हेंबर रोजी नळदुर्ग शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच शहरात सज्जनगड येथील समर्थ रामदास स्वामी यांच्या मुळ पादुकांचे आगमन झाले. यावेळी ब्राम्हण गल्ली येथील श्री राम मंदिरात रामदासी परीवाराकडुन पादुकांचे पुजन करण्यात आले. यावेळी आत्माराम रामदासी व प्राजक्ता रामदासी यांनी पादुकांची विधिवत पुजा केली. यावेळी स. भ. सावरीकर, कौस्तुभबुवा जोशी, प्रतीक क्षीरसागर, शरदबुवा रामदासी, चैतन्य पाघे यांनी मंत्रघोष केला तर उत्तम रामदासी, वसंत रामदासी, अच्युत रामदासी व सौरभ रामदासी यांनी पुजा केली. यानंतर पादुकांची वाजत, गाजत शहरातील मुख्य रस्त्यावरून मिरवणुक काढण्यात आली. श्री राम मंदिरापासुन सुरु झालेली मिरवणुक सावरकर चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, चावडी चौक, भवानी चौक मार्गे श्री राम मंदिरात आल्यानंतर मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले. प्रत्येक चौकात मिरवणुकीचे स्वागत करून नागरीकांनी श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या पादुकांचे दर्शन घेतले. मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर रामदासी परिवाराकडुन उपस्थित नागरीकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या मिरवणुकीत शहरातील माजी नगरसेवक, सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार व नागरीक विशेष करुन महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post