नळदुर्ग :- नळदुर्ग येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे ग्राहक दिगंबर अर्जुन बाबर यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्यामुळे त्यांच्या पत्नी आशा दिगंबर बाबर रा. गुळहळळी ता. तुळजापुर यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत बँकेचे व्यवस्थापक कल्पेश घोडके यांच्या हस्ते 2 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे.गुळहळळी येथील दिगंबर अर्जुन बाबर हे नळदुर्ग येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक आहेत. 13 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांचा ह्रदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांनी बँकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत विमा घेतला होता. याचा फायदा त्यांच्या कुटुंबाला झाला असुन त्यांच्या आकस्मित मृत्यु नंतर त्यांच्या पत्नी आशा दिगंबर बाबर यांना या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे. 17 ऑक्टोबर रोजी बँकेचे व्यवस्थापक कल्पेश घोडके यांच्या हस्ते व बँकेचे सेवा प्रबंधक प्रविण साठवणे व सहाय्यक उत्कर्ष धोटे, दत्ता निकम यांच्या उपस्थितीत आशा दिगंबर बाबर यांना 2 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे.
*************************
यावेळी बोलतांना बँकेचे व्यवस्थापक कल्पेश घोडके यांनी म्हटले आहे की, शाखेच्या ग्राहकांसाठी बँकेमार्फत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना राबविण्यात येत आहे. ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा त्याचबरोबर खास स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी बँकेच्या वतीने वार्षिक 2 हजार रुपयामध्ये अपघात मृत्यु विमा रुपये 40 लाख इतका विमा कव्हर दिला आहे याचाही लाभ बँकेच्या सर्व खातेदारांनी घ्यावे असे आवाहन कल्पेश घोडके यांनी केले आहे.
***************************
