नळदुर्ग :- नळदुर्ग येथील व्यापारी गणेश मंडळाने गणेशोत्सवानिमित्त सर्वरोग निदान शिबीर, नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटपपाचा कार्यक्रम आयोजित करून खऱ्या अर्थाने सामाजिक कार्य केले आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद व समजपयोगी असल्याचे नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. चंचल बोडके यांनी म्हटले आहे.
नळदुर्ग येथील व्यापारी गणेश मंडळाने यावर्षी वृक्ष लागवडीसह विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करून खऱ्या अर्थाने गणेशोत्सव कसा साजरा करायचा हे दाखवुन दिले आहे. व्यापारी गणेश मंडळाच्या या कार्याचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.30 ऑगस्ट रोजी व्यापारी गणेश मंडळाच्या वतीने सर्वरोग निदान शिबीर, नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मल्लिकार्जुन मंदिराच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य शिवाजीराव मोरे हे होते. या कार्यक्रमाचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते डॉ. सिद्रामप्पा खजुरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. चंचल बोडके, विलास येडगे, लतिफ शेख, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष सुभाष कोरे व सामाजिक कार्यकर्त्या कल्पना गायकवाड हे उपस्थित होते.प्रारंभी मान्यवारांच्या हस्ते श्री गणपतीची पुजा करण्यात आली. यानंतर शहरातील मुख्य चावडी चौकात चावडीच्या इमारतीसमोर डॉ. चंचला बोडके व डॉ. सिद्रामप्पा खजुरे यांच्या हस्ते वृक्ष लावण्यात आले.यावेळी बोलतांना डॉ. चंचल बोडके यांनी म्हटले की, गणेशोत्सवाच्या माध्यमातुन व्यापारी गणेश मंडळाने गरीब व गरजु नागरीकांसाठी जे मोफत सर्वरोग निदान शिबीर आयोजित केले आहे ते कौतुकास्पद आहे.
--------------------------------------
शहरातील नागरीकांनी उपजिल्हा रुग्णालयात सुरु असलेल्या विविध आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा. त्याचबरोबर आज नागरीकांनी अवयव दान करण्यासाठी पुढे यावे आपला मृत्यु झाल्यानंतर आपल्या अवयामुळे कुणाला जीवदान मिळत असेल तर यापेक्षा पुण्याचे दुसरे कुठले काम नाही. आज व्यापारी गणेश मंडळाप्रमाणेच शहरातील इतर गणेश मंडळानीही अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करावे असेही शेवटी त्यांनी म्हटले आहे.
-----------------------------------------
यावेळी डॉ. सिद्रामप्पा खजुरे, शिवाजीराव मोरे व डॉ. आनंद काटकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करतांना व्यापारी गणेश मंडळाच्या या समजपयोगी कार्याचे कौतुक करून व्यापारी गणेश मंडळाने हे कार्य असेच पुढेही सुरु ठेवावे असे म्हटले आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी केले तर आभार व्यापारी मंडळाच्या सदस्या कल्पना गायकवाड यांनी मानले. व्यापारी गणेश मंडळाने आयोजित केलेल्या सर्वरोग निदान शिबीर, नेत्र तपासणी व
मोफत चष्मे वाटप कार्यक्रमास नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिराचा 350 पेक्षा जास्त नागरीकांनी लाभ घेतला. यामध्ये 180 नागरीकांची नेत्र तपासणी करुन त्यांना मोफत चष्मे देण्यात आले तर 170 पेक्षा जास्त नागरीकांची आरोग्य तपासणी करुन त्यांना औषध देण्यात आले.
या सर्वरोग निदान शिबिरात उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. वैभव कवळे, डॉ. अभिजित बागल यांनी नागरीकांची आरोग्य तपासणी त्यांना औषधे दिली. तर डॉ. आनंद काटकर यांनी नेत्र तपासणी करुन नागरीकांना मोफत चष्मे देण्याचे काम केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी व्यापारी गणेश मंडळाचे अध्यक्ष सुभाष कोरे, शहर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष सतीश पुदाले, व्यापारी गणेश मंडळाचे मुकुंद नाईक,दयानंद स्वामी, संतोष
मुळे,राजेंद्र महाबोले, मल्लिनाथ शिरगुरे, वैजनाथ कोरे, कलप्पा कलशेट्टी, शंतनु डुकरे, संदीप सुरवसे, अतुल हजारे, सुनिल गव्हाणे, सुजित बिराजदार, दत्ता गव्हाणे यांच्यासह व्यापारी गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.
---------------------------------------------
नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. चंचल बोडके यांनी नागरीकांनी अवयवदान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नळदुर्ग येथील पत्रकार आयुब शेख यांनी नेत्रदान तर सामाजिक कार्यकर्त्या कल्पना गायकवाड यांनी संपुर्ण अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी डॉ. चंचल बोडके यांच्या हस्ते आयुब शेख व कल्पना गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
-----------------------------------------
