नळदुर्ग :- तू नेहमी समाजसेवेमध्ये का भाग घेतो तू नळदुर्ग आहे का या कारणावरून नळदुर्ग येथे एका तरुणाची कोयत्याने सपासप वार करुन निर्घृण हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी 28 मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नळदुर्ग येथील शिवराज हॉटेल समोर तु नेहमी समाज सेवेमध्ये का भाग घेतोस, तु नळदुर्गचा आहे का या कारणावरून जयकुमार गायकवाड व सुर्यकांत सुरवसे यांच्यात वाद झाला या वादानंतर जयकुमार गायकवाड यांने आपला मुलगा सोहमला बोलावुन घेतले. यावेळी सोहम हातात कोयता घेऊन आला आणि त्यांने थेट सुर्यकांत सुरवसे यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये सुर्यकांत सुरवसे यांचा जागीच मृत्यु झाला.या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ निलेश देशमुख,नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके आनंद कांगूने पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे संतोष गीते व पोलिस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जावुन परिस्थिती व्यवस्थित हाताळली.मयत सुर्यकांत सुरवसे यांच्या पत्नी करुणा सुर्यकांत सुरवसे वय 42 रा. भीमनगर नळदुर्ग हल्ली मुक्काम पनवेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिस ठाण्यात आरोपी सोहम जयकुमार गायकवाड वय 21 व जयकुमार गायकवाड या बाप -लेकाच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी सोहम गायकवाड याला पोलिसांनी अटक केली असुन दुसरा आरोपी जयकुमार गायकवाड याच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके हे करीत आहेत.
