आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

नळदुर्ग :-  नळदुर्ग शहर व परीसरातील नागरीकांच्या अडचणी सोडविण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिटयूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नळदुर्ग येथे 16 मे रोजी घेतलेल्या "जनता दरबारास" नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नागरिकांच्या अडचणी व समस्या जाणुन घेतल्या.नळदुर्ग येथील नगरपालिका कार्यालयात  16 मे रोजी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नळदुर्ग शहर व परीसरातील नागरीकांच्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी जनता दरबारचे आयोजन केले होते. यावेळी नगरपालिका कार्यालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रत्येक नागरीकांची समस्या व अडचण समजून घेऊन त्या सोडविण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.प्रारंभी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नगरपालिका कार्यालयात आगमन झाल्यानंतर नगरपालिकेचे नगरअभियंता वैभव चिंचोले यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा सत्कार केला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, अनिल काळे, नेताजी पाटील, सतीश दंडनाईक,माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे,भाजपचे नळदुर्ग शहर अध्यक्ष बसवराज धरणे, सुशांत भूमकर, भाजपच्या तालुका अध्यक्षा रंजना राठोड, तालुका सरचिटणीस विलास राठोड, तुळजापुर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. आशिष सोनटक्के, माजी जि. प. सदस्य ॲड. दीपक आलुरे, धिमाजी घुगे माजी नगरसेवक, सुधीर हजारे, संजय बताले, भाजपचे माजी शहर अध्यक्ष पद्माकर घोडके,  संजय  जाधव, विनायक अहंकारी, भाजपचे तालुका सरचिटणीस श्रमिक पोतदार,माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे,विजय शिंगाडे, भाजपचे शहर उपाध्यक्ष गणेश मोरडे, विजय ठाकुर,बबन चौधरी, अक्षय भोई, दत्ता राजमाने, महादेव पाटील यांच्यासह भाजपचे जिल्हा तसेच तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.या जनता दरबार मध्ये नळदुर्ग शहरातील नागरीकांनी मुलभुत सुविधा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, पंतप्रधान आवास योजना तसेच शहरातील रस्त्याच्या संदर्भातील समस्या संदर्भात निवेदने देण्यात आले.



Post a Comment

Previous Post Next Post