नळदुर्ग :- तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथे जेष्ठ समाजसेवक डॉ सिद्रामप्पा खजूरे यांच्या संकल्पनेतून श्री संत मारुती महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून १ मे पासुन बालसंस्कार शिबिराची सुरुवात झाली असुन २२ मे रोजी या शिबीराची सांगता होणार आहे .पंचक्रोशीतील वीस गावातील साठ बालके या शिबीराचा लाभ घेत असुन संगीत, व्यक्तीमत्व विकासाबरोबरच आध्यात्मिककेचे धडे घेत आहेत.शाळा संपली आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या मुलांनी आपला सुट्टीतला वेळ वाया घालवू नये म्हणून जेष्ठ समाजसेवक डॉ सिद्रामप्पा खजूरे यांच्या संकल्पनेतून मुलांमध्ये व्यक्तीमत्व विकास व संस्काराची पेरणी करण्यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहेया शिबीरामध्ये हभप वैभव महाराज कानेगावकर,हभप शुभम महाराज कानेगावकर, जेष्ठ समाजसेवक डॉ सिद्रामप्पा खजूरे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
-------------------------------------------
या शिबीरामध्ये किर्तन,प्रवचन कसे करायचे, मृदंग वादन,पेटी वादन याचे धडे,गीतेचा संस्कृतमधील अभ्यास, हरिपाठ, मुलांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी विविध, व्याख्यान ,अभंग,भारुड,गवळणी,मुलांचे वाचन घेणे आदि कार्यक्रम या शिबीरामध्ये संपन्न होत आहेत. पंचक्रोशीतील वीस गावातील साठ बालके या शिबीराचा लाभ घेत असुन संगीत, व्यक्तीमत्व विकासाबरोबरच आध्यात्मिककेचे धडे घेत आहेत.शाळा संपली आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या मुलांनी आपला सुट्टीतला वेळ वाया घालवू नये म्हणून जेष्ठ समाजसेवक डॉ सिद्रामप्पा खजूरे यांच्या संकल्पनेतून मुलांमध्ये व्यक्तीमत्व विकास व संस्काराची पेरणी करण्यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहेया शिबीरामध्ये हभप वैभव महाराज कानेगावकर,हभप शुभम महाराज कानेगावकर, जेष्ठ समाजसेवक डॉ सिद्रामप्पा खजूरे यांचे मार्गदर्शन मिळत आहे
---------------------------------------------
या शिबीरामध्ये किर्तन,प्रवचन कसे करायचे, मृदंग वादन,पेटी वादन याचे धडे,गीतेचा संस्कृतमधील अभ्यास, हरिपाठ, मुलांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी विविध व्याख्यान,अभंग, भारुड,गवळणी,मुलांचे वाचन घेणे आदि कार्यक्रम या शिबीरामध्ये संपन्न होत आहेत
---------------------------------------------
सध्याची पिढी वेगळ्या विचाराने वहात चाललेली आहे, त्यामुळे प्रत्येक पालक हा आपल्या बालकांचा विचार करीत आहे, त्यामुळे वारकरी सांप्रदायाचे वळण लागण्यासाठी, आणि त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, फक्त टाळ पक्वाजाचेच शिक्षण न देता चांगले आणि सुंदर आयुष्य जगण्यासाठी ज्या संस्काराची गरज आहे ते संस्कार या शिबीरामध्ये दिले जातात :--- हभप वैभव महाराज कानेगावकर
---------------------------------------------
या शिबीरात संस्कारातून भोळेपणा येणार नाही तर अंध:श्रध्देचे समर्थनही होणार नाही तर वाईट गोष्टींपासून आजचा बालक दूर रहावा,त्याच्यातील दुर्गुण कमी व्हावेत, व्यसनाधीनता, नैराश्य दूर व्हावे, आई वडीलांची सेवा करावी,त्यांच्यात कलेचा अविष्कार निर्माण व्हावा,व कठीण परिस्थितीत जीवन जगण्यासाठी सामर्थ्य निर्माण करण्यासाठीचे संस्कार या शिबीरामध्ये करण्यात येत आहेत
:- डॉ सिद्रामप्पा खजूरे, जेष्ठ समाजसेवक खुदावाडी
