पै. शिवराज राक्षे यांने पंजाबचा पैलवान भोला पंजाबी ला अस्मान दाखवित बनला नळदुर्ग केसरीचा मानकरी



नळदुर्ग :- नळदुर्ग येथे 14 जानेवारी रोजी नळदुर्ग नगरपालिका व श्रीक्षेत्र खंडोबा यात्रा कुस्ती आखाडा समितिच्या वतीने लाखो रुपये बक्षीसांच्या भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजण करण्यात आले होते.या कुस्ती स्पर्धेचे उदघाटन आमदार राणाजगजितसिंह पाटील व तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन सुनिल चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुस्ती आखाडा समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.या कुस्ती स्पर्धेमध्ये १०० पेक्षा जास्त लहान मोठ्या हजारो रुपये बक्षिसांच्या कुस्त्या झाल्या. या स्पर्धेतील मानाची व रोख 2 लाख 51 हजार रुपये व मानाच्या चांदीच्या गदा यासाठी झालेल्या कुस्तीमध्ये डबल महाराष्ट्र केसरी विजेता पै. शिवराज राक्षे आणि हरीयाणा केसरी तसेच भारत केसरी विजेता पै.भोला पंजाब यांच्यात अतिशय चित्तथरारक व डोळे दिपवुन टाकणारी झाली. या कुस्तीमध्ये पै.शिवराज राक्षे याने अवघ्या पाच मिनिटात एक चाकी डावावर पंजाबचा पै. भोला याला अस्मान दाखवुन चितपट केले. यावेळी हजारो कुस्ती प्रेमींनी एकच जल्लोष केला. यावेळी विजयी पै. शिवराज राक्षे याला कुस्ती प्रेमी नागरीकांनी खांद्यावर उचलुन घेत एकच जल्लोष केला. विजयी पैलवान शिवराज राक्षे याला युवा नेते सुनिल चव्हाण यांच्या हस्ते रोख 2 लाख 51 हजार रुपये व कै. नरहरी बापुराव पुदाले यांच्या स्मरणार्थ पुदाले परीवाराच्या वतीने ठेवण्यात आलेला मानाचा चांदीचा गदा देऊन त्याचा भव्य सन्मान करण्यात आला. या स्पर्धेत नळदुर्गचा बाल पैलवान पै. समर्थ घोडके हा "बाल केसरी" या किताबाचा मानकरी ठरला आहे. पै.समर्थ घोडके याने बालकेसरी साठी झालेल्या कुस्तीमध्ये बाल पैलवान शंकर थिटे याला चारीमुंड्या चीत करून बाल केसरी हा कीताब पटकाविला. बालकेसरी विजेता ठरलेल्या पै.समर्थ घोडके याला रोख रक्कम व मानाचा चांदीचा गदा देण्यात आला आहे.या स्पर्धेतील महाराष्ट्र पोलिस प्राधिकरण समितीचे सदस्य उमाकांत मिटकर यांनी ठेवलेल्या २१ हजार रुपये बक्षिसाच्या कुस्तीमध्ये अणदुरचा पै.राहुल मुळे हा विजयी ठरला आहे. राहुल मुळे याने दिल्लीचा पैलवान सोनुसिंग याला चितपट करत ही कुस्ती जिंकली.या स्पर्धेत महिलांच्याही कुस्त्या झाल्या यामध्ये पै. अहिल्या लवटे व पै. बलजीत कौर दिल्ली यांच्यात झालेली कुस्ती ही बरोबरीत सुटली तर मुलाबरोबर खेळलेल्या कुस्तीमध्ये महिला पै. श्वेता कार्ले ही विजयी ठरली. 

**************************

 नळदुर्ग चे सुपुत्र निजामोद्दीन सय्यद ने विजय लवटे ला केले चितपट

या स्पर्धेत अनेक नामांकीत पैलवनांच्या चित्तथरारक कुस्त्या झाल्या. यामध्ये नळदुर्गचा पै. निजामोद्दीन सय्यद आणि पै. विजय लवटे यांच्यात झाली. या चित्तथरारक झालेल्या कुस्तीमध्ये निजामोद्दीन सय्यद याने विजय लवटे याला चितपट करत ही कुस्ती जिंकली. या स्पर्धेतील बहुतांश कुस्त्या या निकाली झाल्या आहेत.सर्वच कुस्त्या अतीशय शांततेत पार पडल्या.या स्पर्धेतील सर्व विजयी पैलवानांना नमांकीत पैलवान अप्पासाहेब साखरे यांच्याकडुन आकर्षक ट्रॉफी भेट देण्यात आली.

 ****************************

या स्पर्धेतील कुस्त्या उमाकांत मिटकर, डॉ. जितेंद्र पाटील, संजय दशरथ जाधव, वैभव पाटील,नुरानी ग्रुप नळदुर्ग, महादेव पाटील (होर्टी),कै. मोतीराम चव्हाण यांच्या स्मरणार्थ अमोल चव्हाण (आलियाबाद),कै. विजयकुमार धरणे यांच्या स्मरणार्थ माजी नगरसेवक बसवराज धरणे,भाजपचे तालुका उपाध्यक्ष संभाजी कांबळे,कै. अप्पाराव बेडगे यांच्या स्मरणार्थ विकास सोसायटीचे चेअरमन संजय बेडगे यांच्यासह अनेकांनी रोख बक्षीसांच्या कुस्त्या लावुन कुस्ती आखाडा समितीला सहकार्य केले.

**************************

 ही कुस्ती स्पर्धा सुरु असतांना धाराशिव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संजय जाधव व पोलिस प्राधिकरण समितीचे सदस्य उमाकांत मिटकर, पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, पोलीस उपनिरीक्षक संतोष गीते यांनी भेट देऊन कुस्ती पाहण्याचा आनंद घेतला यावेळी कुस्ती आखाडा समितीच्या वतीने सर्व मान्यवरांचा व प्रतिष्ठित नागरीकांचा मानाचा फेटा बांधुन सत्कार करण्यात आला.

***************************

या स्पर्धेत पंच म्हणुन विनोद घुगे, सुधाकर चव्हाण, धनराज भुजबळ, सुंदर जवळगे,मार्तंड मोकाशे बबलु धनके, शिवाजीराव वऱ्हाडे व मारुती घोडके यांनी काम पाहिले.ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी श्रीक्षेत्र खंडोबा यात्रा कुस्ती आखाडा समितीचे अध्यक्ष राजाभाऊ ठाकुर, अनिल पुदाले,बंडु पुदाले,समितीचे मार्गदर्शक सल्लागार नंदकुमार डुकरे,पांडु पुदाले, संजय मोरे,सुधाकर चव्हाण, शिवाजीराव वऱ्हाडे, मारुती घोडके, सुहास येडगे, तानाजी जाधव, दत्तात्रय कोरे,सुनील उकडें यांच्यासह शहरांतील कुस्ती प्रेमी नागरीकांनी परीश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post