नळदुर्ग:- तालुक्याच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी जनतेने एक संधी दिल्यास त्या संधीचा सोनं करून आश्वासने न देता काम करून दाखवीन असे मत महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड धीरज पाटील यांनी नळदुर्ग येथे आयोजित महाविकास आघाडीच्या बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले. काँग्रेस पक्षाने तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी ॲड. धीरज पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर नळदुर्ग येथे महाविकास आघाडीचे वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी प्रथमच नळदुर्ग शहरात आलेले महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड धीरज पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष रामचंद्र आलूरे, माजी नगराध्यक्ष शहेबाज काजी, दत्तात्रय दासकर, माजी उपनगराध्यक्ष संजय मोरे, माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेबूब शेख, सरदार सिंग ठाकूर, संतोष पुदाले, हरीश जाधव, बशीर शेख, शाहेदाबी सय्यद, राजेंद्र जाधव, सलमान काजी, वैभव जाधव, ताजोद्दीन शेख, वसीम कुरेशी, संदीप सुरवसे, लक्ष्मण चव्हाण, उजेद काजी, जयवंत मुळे, नेताजी महाबोले यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी नगराध्यक्ष शहेबाज काजी, दत्तात्रय दासकर, कमलाकर चव्हाण, रामचंद्र आलूरे, संतोष पुदाले, बशीर शेख, ताजोद्दीन शेख, उजेद काजी, लक्ष्मण चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत नळदुर्ग शहरातील जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक संतोष पुदाले यांनी केले. तर आभार नेताजी महाबोले यांनी मानले.

