धाराशिव:- जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या आदेशावरुन अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 11 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा सुमारे 6,960 लिटर द्रव नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट करण्यात आला तर सुमारे 199 लिटर गावठी दारु व देशी- विदेशी दारुच्या एकुण 138 बाटल्या असे मद्य जप्त केले. ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रव व जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 3,94,990 ₹ आहे. यावरुन 11 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 11 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.1)शिराढोण पोलीस ठाण्याच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. यात घारगाव तांडा ता.कळंब जि. धाराशिव येथील-विनोद बालाजी पवार, हे 06.40 वा. सु.घारागाव तांडा येथे गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला सुमारे 3,400 लिटर द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले. तसेच घारागाव तांडा ता. कळंब जि. धाराशिव येथील- गोरख विनायक राठोड, हे 07.30 वा. सु. घारागाव तांडा येथे गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला सुमारे 2,800 लिटर द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले.2)आंबी पोलीस ठाण्याच्या पथकाने 2 ठिकाणी छापा टाकला. यात शेळगाव ता. परंडा जि. धाराशिव येथील-किरण विजयकुमार दैन, वय 33 वर्षे, हे 13.00 वा.सु. शेळगाव येथे देशी विदेशी दारुच्या 45 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या असताना पथकास आढळल्या.तसेच चिंचपुर बु ता. परंडा जि. धाराशिव हे 15.10 वा. सु. चिंचपुर बु.,येथे 67 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेली असताना पथकास आढळले.3)भुम पो.ठा. च्या पथकाने भुम शहरात छापा टाकला. यावेळी एम.एस.ई.बी सब स्टेशनचे बाजूला भुम ता. भुम जि. धाराशिव येथील- पुजा बिरुदेव पवार, वय 23 वर्षे या 09.20 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला सुमारे 150 लिटर द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले.4)तामलवाडी पो.ठा. च्या पथकाने सावरगाव शिवारात छापा टाकला. यावेळी सावरगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव येथील-विकास आदीनाथ स्वामी, वय 32 वर्षे, हे 13.00 वा. सु. सावरगाव येथे केमवाडी जाणारे रोडलगत देशी विदेशी दारुच्या 79 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या असताना आढळल्या.5) येरमाळा पो. ठा. पथकाने तेरखेडा गावात छापा टाकला. यावेळी लक्ष्मी पारधी पिढी तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव येथील- पिंन्टु साहेबा काळे, वय 45 वर्षे, हे 14.25 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर 22 गावठी दारु व गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला सुमारे 60 लिटर द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले.6) नळदुर्ग पो.ठा.च्या पथकाने जळकोटवाडी येथे छापा टाकला. यावेळी जळकोटवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव येथील-चंद्रकांत लक्ष्मण बनसोडे, वय 65 वर्षे, हे 17.05 वा. सु. जळकोटवाडी शिवारात 30 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले.7)तुळजापूर पो.ठा. च्या पथकाने आपसिंगा गावात छापा टाकला. यावेळी आपसिंगा ता.तुळजापूर जि. धाराशिव येथील- वंदना शंकर थोरात, वय 40 वर्षे या 18.15 वा. सु. शोळजवळ आपसिंगा येथे 80 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले.8)परंडा पो.ठा. च्या पथकाने पिंपळवाडी गावात छापा टाकला. यावेळी पिंपळवाडी चांदणी ता. परंडा जि. धाराशिव येथील-कमल किसन काळे, वय 57 वर्षे, या 15.30 परंडा ते बार्शी जाणारे रोडचे दक्षिण बाजूस पिंपळवाडी येथे गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला सुमारे 550 लिटर द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले.9)बेंबळी पो.ठा. च्या पथकाने केशेगाव गावात छापा टाकला. यावेळी केशेगाव ता. जि. धाराशिव येथील-आखील अब्दुल शेख, वय 40 वर्षे, हे 18.30 वा. सु. केशेगाव येथे देशी विदेशी दारुच्या 14 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या असताना आढळल्या आहेत याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

