अणदूर :- काँग्रेस पक्षाने माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्यावर अन्याय केला असून,पक्षाने पुनर्विचार करून पुन्हा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांना उमेदवारी द्यावी, अन्यथा माजी मंत्री चव्हाण यांनी आता संयमी भूमिका न घेता आपला अपक्ष फॉर्म भरावा जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असा विश्वास व्यक्त करीत अणदूर येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या घरी जाऊन विनंती केली. व आपल्या भावना व्यक्त केल्या.तुळजापूर विधानसभा मतदार संघात काँग्रेस ने ॲड धीरज पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर अणदूर व परिसरातील लोकांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता त्याचाच एक भाग म्हणून मोठ्या संख्येने लोक सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन आता माघार घ्यायची नाही असा निर्धार व्यक्त केला. या वेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी योग्य निर्णय घेऊ आपण शांत रहावे असे आवाहन केले.या वेळी मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात आल्या या वेळी ॲड. विशाल शेटे,माजी सरपंच धनराज मुळे, शरणप्पा कबाडे, अणदूर चे उपसरपंच डॉ. नागनाथ कुंभार, ग्रामपंचायत सदस्य डॉ विवेक बिराजदार यांची भाषणे झाली,झालेल्या भाषणात काँग्रेस पक्षाने घोषित केलेली उमेदवारी बदलून माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांना उमेदवारी घोषित करावी, नाहीतर माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी ही निवडणूक अपक्ष लढवावी संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. त्याकरिता 29 ऑक्टोबर रोजी तुळजापूर येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा करण्यात आली,या वेळी,आप्पू धमुरे, संतोष दादा मुळे, संगप्पा हगलगुंडे, बाबुराव मुळे, कारबसपा धमुरे, मधुकर बंदपट्टे, खंडू मुळे, सुधीर ठाकूर आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. त्यामुळे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

