महान तपस्वी श्री बालयोगी परमहंस महेश्वरानंद महाराजांनी आपल्या छातीवर घटस्थापना करुन अनुष्ठान ला केली सुरवात





नळदुर्ग :- आई राजा उदो, उदोच्या जयघोषात नळदुर्ग येथे 3 ऑक्टोबर रोजी शारदीय नवरात्र महोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. नवरात्र महोत्सव निमित्त नळदुर्ग येथे सहा ठिकाणी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावर्षी शारदीय नवरात्र महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे नळदुर्ग येथील अंबाबाई मंदिर परीसरात महान तपस्वी श्री बालयोगी परमहंस महेश्वरानंद महाराज हे आपल्या छातीवर घटस्थापना करून लोक कल्याणासाठी अनुष्ठानाची सुरूवात केली आहे. त्याठिकाणी सकाळी 10 वा. संकल्प यज्ञ करण्यात आला. यावेळी रुद्राभिषेक करण्यात आला. यावेळी  51 हजार रुद्रास सिद्ध करण्यात आले. हे सिद्ध करण्यात आलेले रुद्राक्ष श्री महेश्वरानंद महाराज यांच्या हस्ते 4 ऑक्टोबर पासुन भाविकांना वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर याठिकाणी देवींच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. हा संकल्प यज्ञ दुपारी दीड वाजेपर्यंत चालला. यानंतर दुपारी दीड वाजता श्री महेश्वरानंद महाराज हे आपल्या छातीवर घटस्थापना करून अनुष्ठानास सुरुवात केली आहे. आता पुढील दहा दिवस म्हणजे 12 ऑक्टोबर पर्यंत श्री महेश्वरानंद महाराज हे आपल्या छातीवर घटस्थापना करून एकाच आसनात अन्न-पाणी तसेच सर्व नैसर्गिक विधिंचा त्याग करून हे अनुष्ठान करणार आहेत. 3 ते 12 ऑक्टोबर या कालावधीत साजरा होणाऱ्या श्री अंबाबाई नवरात्र महोत्सवानिमित्त जगदंबादेवी (अंबाबाई) देवस्थान ट्रस्ट व अंबाबाई मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन सकल हिंदू समाज नळदुर्ग शहरच्या वतीने करण्यात आले आहे.




Post a Comment

Previous Post Next Post