नळदुर्ग :- येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ' स्वच्छता ही सेवा-२०२४' अंतर्गत १७ संप्टेबर ते २ ऑक्टोबर दरम्यान 'स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता पंधरवाडा साजरा करण्यात आला. प्रथमतः महाविद्यालयात प्राचार्य डॉ सुभाष राठोड, ग्रीन क्लब समन्वयक डॉ उद्धव भाले, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी दादासाहेब जाधव यांच्यासह उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांनी स्वच्छेतेची शपथ घेतली. त्यानंतर ह्या स्वच्छता पंधरवाडा बाबतचे महत्त्व आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची भूमिका याबाबत राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा दादासाहेब जाधव यांनी माहिती सांगितली. त्यानंतर प्राचार्य डॉ राठोड यानी स्वच्छेते विषयी विविध कार्यक्रम कोणते व कसे घ्यायचे याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर महाविद्यालयातील ग्रीन क्लब, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेनातील विद्यार्थी विद्यार्थ्यांनीनी महाविद्यालय परिसरातील कचरा प्लॉस्टीक, गवत,वृक्षाजवळील तृण स्वच्छता केली. त्यानंतर सर्वजण बसस्थानक या ठिकाणी जावून सर्व बसस्थानक परिसर स्वच्छ करून ओला,सुका कचरा, प्लास्टीक आदी स्वच्छ करून कचरा कुंडीत टाकण्यात आला. त्यानंतर काही दुकानदार आणि नागरिकांच्या स्वच्छतेविषयीच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी शहरवासीयांनी या महाविद्यालय व विध्यार्थ्यांचे कौतूक व अभिनंदनही केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आलियाबाद येथील स्मशानभूमीतील कचरा, घाण, वाढलेली झाडे गवत काढले सर्वात शेवटी नळदुर्ग येथील असलेल्या भूईकोट किल्याच्या पायथ्याला असलेल्या आणि स्मशान भूमिच्या बाजूला असलेल्या नदीतील कचरा, प्लॉस्टीक, शेवाळ, लाकडे आदी स्वच्छ करण्यात आले. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी ग्रीन क्लब समन्वयक प्रा डॉ उध्दव भाले, प्रा डॉ निलेश शेरे, प्रा डॉ हंसराज जाधव, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा दादासाहेब जाधव, प्रा बाबासाहेब सावते, प्रा डॉ युवराज पाटील, राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी लेप्टन्ट प्रा डॉ अतिश तिडके प्रा. धनंजय चौधरी, प्रा. संजय गोरे, प्रा. झरीना पठाण यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयांतील सर्व विभाग प्रमूख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
