युवानेते सुनील (RK) चौधरी यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार सुरक्षा समिती वतीने सत्कार

 




दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर (प्रतिनिधी) - सोलापूर शहरात सामाजिक क्षेत्रात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे नेहमीच युवकांच्या अडचणीत धावून जाणारे ज्यांनी आजवर अनेक गोर गरिबांसाठी समाजसेवेतून मदतीचा हात देत आले असून अश्याप्रकारे समाजात युवक वर्गात आदर्श निर्माण करत सामाजिक कार्यकर्ते युवानेते युवकांच्या गळ्यातील ताईत असणारे सुनील (Rk) चौधरी यांच्या  वाढदिवसानिमित्त पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश तथा संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे राज्यसचिव डॉ.आशिषकुमार सुना दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन मिठाई भरवून सत्कार सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी युवकांनी सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन वंचित पिडीत अन्यायग्रस्त घटकांसाठी काम करावे सुनील यांच्या प्रमाणे सर्वच युवकांनी सामाजिक कार्यात सहभाग घेतला पाहिजे असे सांगत सुनील (RK) चौधरी यांना वाढदिवसाच्या व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर वाढदिवसाच्या सत्काराला उत्तर देताना सुनील चौधरी यांनी आपण सर्व पत्रकारांनी तथा पत्रकार सुरक्षा समितीच्या सर्व सन्माननीय पदाधिकारी व सदस्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त आज माझा सत्कार करून माझी समाजाप्रती जबाबदारी वाढवली असून नेहमीच मी गोरगरीब वंचित पिडीत अन्यायग्रस्त लोकांना आणखी चांगल्या पद्धतीने न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन दिले. याप्रसंगी  पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा अध्यक्ष संतोष म्हेत्रे जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार सादिक शेख शहर अध्यक्ष राम हुंडारे अन्सार तांबोळी (BS) मोहोळ तालुका अध्यक्ष बंडू तोडकर  शुक्राचार्य शेंडेकर उपाध्यक्ष सचिव शहाजी शिंदे  सिध्देश्वर भालेराव अजय चौधरी सिद्धार्थ गाडे अभिषेक जाधव प्रणव कांबळे चेतन ननावरे नितीन फटफटवाले अक्षय चौधरी रिजवान शेख इम्तियाज अक्कलकोटकर रवी रणदिवे आदी पत्रकार बांधव व मित्रपरिवार उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post