नळदुर्ग :- येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय छाञ सेनेच्या युनिट च्या वतीने भारत सरकारकडून आयोजित कार्यक्रम "इंद्रधनु 2024 आरोग्यदायी समाज "विचार धारेला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमात इंद्रधनु म्हणजेच सात प्रकारच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले .यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन उपस्थित महाविद्यालयातील हिन्दी विभागातील डॉ . हाशिम मिर्झा यांचे इंद्रधनु मध्ये आरोग्याचे लक्षण व सरकारकडून घेण्यात येणारी काळजी व राष्ट्रीय छात्र सेनेतील विद्यार्थ्यांनी समाजात या विषयी जन जागृती निर्माण करणे कसे गरजेचे आहे व देशसेवेची भावना मनामध्ये रुजवण्याची आज का गरज आहे. या विषयी सखोल असे मार्गदर्शन केले .या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष राठोड होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून वनस्पती शास्त्राचे डॉ. विजय सावंत हे उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.सुभाष राठोड म्हणाले की आज समाज अनेक रोगांना बळी पडत आहे तरुणांनी पुढाकार घेऊन असाध्य रोगाविषयी जागरुक राहून समाजातील अंधश्रद्धा दूर कशी होईल तसेच समाज कसा बळकट व निरोगी राहील याकडे प्रामुख्याने लक्ष देणे हे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक लेफ्टनंट डॉ.अतिष तिडके यानी केले.तर आभार डॉ.सुभाष जोगदंडे यांनी मानलेल्या अतिथी म्हणून वनस्पतीशास्त्र प्रमुख डा.विजय सांवत हे होते.या कार्यक्रमास डॉ.अशोक कांबळे डॉ. बाळासाहेब पाटील यांच्यासह छात्र सेनेचे विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
