नळदुर्ग :- नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीसाठी 15 नोव्हेंबर रोजी अध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी वेगवेगळ्या पक्षाच्या एकुण 10 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत या निवडणुकीसाठी एकुण 18 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. नळदुर्ग नगरपालिकेची निवडणुक 2 डिसेंबर रोजी होत आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर ही आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक आहेत. रविवार दि. 16 नोव्हेंबर रोजीही उमेदवारी अर्ज स्विकारले जाणार आहेत. त्यामुळे रविवार आणि सोमवारी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.15 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नगराध्यक्ष पदासाठी आतापर्यंत दोन अर्ज दाखल झाले आहेत. 14 नोव्हेंबर रोजी. अध्यक्ष पदासाठी शेख मोहम्मद मुजम्मिल यांनी अपक्ष म्हणुन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.15 नोव्हेंबर रोजी एकुण 11 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये अध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर नगरसेवक पदासाठी प्रभाग क्र 6 अ मधुन कादरी तैबा अकबर,प्रभाग क्र. 5 अ मधुन काझी फरहीन आक्रमोद्दीन, प्रभाग क्र. 2 अ मधुन बनसोडे अमित राजेंद्र, प्रभाग क्र. 4 अ मधुन कुलकर्णी विजया प्रमोद, प्रभाग क्र. 4 अ मधुन कुलकर्णी विजया प्रमोद, प्रभाग क्र. 5 अ मधुन काझी इल्याजबेगम जहीरोद्दीन, प्रभाग क्र. 5 ब मधुन जाधव तानाजी कोंडीबा, प्रभाग क्र. 4 अ मधुन बेडगे सुरेखा चंद्रकांत व प्रभाग क्र. 4 ब मधुन भाजपचे नेते भुमकर सुशांत सुभाष यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
