प्रेशर पॉलिटिक्समुळे आघाडीचा तिढा सुटेना इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली


नळदुर्ग :- दहा नोव्हेंबर पासून  उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. असे असताना नगरपालिकेची होणारी ही निवडणूक एकत्रित लढायचं की स्वबळावर लढायचे हे निश्चित न झाल्यामुळे इच्छुक उमेदवारांची बेचैनी व टेन्शन वाढले आहे. कारण 17 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे असे असताना सुद्धा आघाडी होणार की नाही हे निश्चित होत नसल्यामुळे तसेच  महाविकास आघाडी चे घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये आघाडीचा फार्मूला ठरविण्याकरिता होणाऱ्या बैठकीत तोडगा काढणे ऐवजी सीट शेअरिंग च्या टेबलवर बसून प्रेशर पॉलिटिक्स चा फॉर्मुला वापरला जात असल्यामुळे आघाडी पूर्वीच दोन्ही पक्षात तानातन सुरू आहे.त्यामुळे दोन्ही पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या इच्छुकांची टेन्शन वाढले आहे.कारण दोन्ही पक्षाच्या शहरातील प्रमुख नेत्यांमध्ये  मध्ये दोन-तीनदा  बैठका होऊन सुद्धा तोडगा निघत नसल्यामुळे या निवडणुकीत काही झालं तरी आपण निवडणूक लढविणारच असे ठामपणे सांगणाऱ्या इच्छुकांची मात्र गोची झाली आहे. नळदुर्ग नगरपालिकेचा नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी सुटल्यामुळे नगराध्यक्ष पद मिळविण्यासाठी इच्छुकांची भाऊ गर्दी झाली आहे. या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्यासाठी शहरातील दिग्गज उमेदवार इच्छुक असल्यामुळे नगरसेवक पदासाठी देखील मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या वाढली आहे.मात्र ही निवडणूक स्वबळावर लढायचं की आघाडी करून यावर एकमत होत नसल्यामुळे आघाडीचा चेंडू जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांकडे जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांचे दोन-तीन बैठका झाले त्या बैठकीमध्ये नगराध्यक्ष लढविण्यासाठी दोन्ही पक्षातील काही प्रमुख नेते आपणच लढविणार असल्याचे ठामपणे सांगितल्यामुळे तसेच काही प्रभागांमध्ये आपलाच उमेदवार सक्षम असून त्यालाच उमेदवारी द्यावी यासाठी आग्रह होत असल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आघाडीचा पेच फसला आहे. त्याचबरोबर जे राजकीय नेते नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत ते लढविण्यासाठी सक्षम आहेत का याचा देखील विचार केला जात आहे. तसेच 50-50% चा फॉर्मुला दोन्ही पक्षाकडून समोर आला आहे मात्र नगराध्यक्ष आपणच लढविणार असल्याचा आग्रह दोन्ही पक्षाकडून इच्छुक असलेल्या नेत्याकडून होत असल्यामुळे आघाडीचे प्रश्न निकाली लागत नाही. तसेच नगराध्यक्ष पदाची उमेदवारीच्या बदल्यात  उपनगराध्यक्ष आपल्याच पक्षाला मिळावा याकरिता काहीजण  आत्तापासूनच दबाव तंत्राचा वापर करीत असल्यामुळे चर्चेचा विषय पुढे जात नसल्याची माहिती समोर येत आहे. तशीच काही परिस्थिती महायुतीकडून देखील स्पष्ट होत नाही कारण महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवार गट स्वबळाची तयारी करून निवडणुकीच्या उतरला आहे मात्र भाजप व शिवसेना शिंदे गट यांच्याकडून एकत्रित लढणार की  स्वबळावर  लढणार हे स्पष्ट होत नसल्यामुळे त्यांच्याकडून देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post