नळदुर्ग :- नळदुर्ग येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे नय्यरपाशा जागीरदार यांची निवड झाली असुन त्यांनी काँग्रेसचे मारुती खारवे यांचा 3 मताने पराभव केला आहे. उपनगराध्यक्षपदाच्या झालेल्या निवडणुकीत भाजपचे नय्यरपाशा जागीरदार यांना 12 तर काँग्रेसचे मारुती खारवे यांना 9 मते मिळाली आहेत. यावेळी स्विकृत सदस्य म्हणुन भाजपकडुन प्रविण गायकवाड यांची तर काँग्रेसकडुन पत्रकार सुधीर पोतदार यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर भाजपचे गटनेते म्हणुन दत्तात्रय दासकर यांची तर काँग्रेसच्या गटनेतेपदी मारुती खारवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 16 जानेवारी रोजी नगरपलिकेच्या सभागृहात दुपारी 1 वा.नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपनगराध्यक्षपदाची निवडणुक पार पडली.यावेळी भाजप - शिवसेना युतीचे व काँग्रेसचे सर्व नगरसेवक नगरपालिका सभागृहात उपस्थित होते.वास्तविक पाहता नगरपालिकेतील भाजप-शिवसेना युतीचे संख्याबळ पाहता उपनगराध्यक्षपदाची निवडणुक बिनविरोध होईल असे वाटले होते. मात्र काँग्रेसने उपनगराध्यक्ष पदासाठी मारुती खारवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करुन आपण उपनगराध्यक्षपदाची निवडणुक लढविणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे दुपारी 1 वा. पिठासीन अधिकारी नगराध्यक्ष बसवराज धरणे व नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांच्या उपस्थितीत उपनगराध्यक्षपदाची निवडणुक पार पडली. या निवडणुकीत नगरसेवकांनी हात उंचावुन केलेल्या मतदानामध्ये भाजपचे नय्यरपाशा जागीरदार हे उपनगराध्यक्ष म्हणुन निवडुन आल्याचे पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी जाहीर केले. यामध्ये नय्यरपाशा जागीरदार यांना 12 तर काँग्रेसचे मारुती खारवे यांना 9 मते मिळाली आहेत.यावेळी स्विकृत सदस्य म्हणुन भाजपकडुन प्रविण धनराज गायकवाड यांची तर काँग्रेसकडुन पत्रकार सुधीर बाबुराव पोतदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर नगरपालिकेत भाजपचे गटनेते म्हणुन दत्तात्रय दासकर यांची तर काँग्रेसचे गटनेते म्हणुन मारुती खारवे यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीनंतर नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष नय्यरपाशा जागीरदार, स्विकृत सदस्य प्रविण गायकवाड व सुधीर पोतदार यांचा सत्कार करून त्यांचे स्वागत केले आहे.उपनगराध्यक्ष म्हणुन नय्यरपाशा जागीरदार यांची निवड झाल्यानंतर जागीरदार समर्थकांनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची अतिषबाजी करुन मोठा जल्लोष केला. त्याचबरोबर स्विकृत सदस्य म्हणुन भाजपकडुन लहुजी शक्ती सेनेचे शहर अध्यक्ष प्रविण धनराज गायकवाड यांची निवड झाल्यानंतर लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड, धनराज गायकवाड यांच्यासाह कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष करुन आनंदोत्सव साजरा केला.
---------------------------------------------
नळदुर्ग नगरपालिकेच्या 70 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचा नगरपालिकेचे स्विकृत सदस्य म्हणुन मातंग समाज आणि सोनार समाजाला प्रतिनिधित्व मिळाले आहे. मातंग समाजाचे प्रविण धनराज गायकवाड यांची तर सोनार समाजाचे सुधीर बाबुराव पोतदार हे स्विकृत सदस्य म्हणुन नियुक्त झाले आहेत. भाजपने मातंग समाजाला तर काँग्रेसने सोनार समाजाला यामुळे न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. पत्रकार सुधीर पोतदार यांची काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांच्यावर मोठी निष्ठा होती.त्या निष्ठेचे फळ सुधीर पोतदार यांना मिळाल्याचे दिसुन येत आहे. यावेळी नगरपालिका सभागृहात नगरसेवक तानाजी जाधव आणि सुधीर पोतदार यांच्या रूपाने दोन पत्रकार नगरसेवक म्हणुन आहेत.
