नळदुर्ग :- नळदुर्ग शहराच्या विकासाबरोबरच शहरातील बाजारपेठेत योग्य त्या सुविधा उपलब्ध करुन देऊन शहरातील व्यापार वाढण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातुन प्रयत्न करणार असल्याचे नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी नळदुर्ग शहर व्यापारी मंडळाच्या वतीने नवनिर्वाचित नगरध्यक्ष व सर्व पक्षिय नगरसेवकांचा तसेच पत्रकारांच्या आयोजित केलेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलतांना म्हटले.10 जानेवारी रोजी नळदुर्ग येथील मल्लिकार्जुन मंदिरात शहर व्यापारी मंडळाच्यावतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व 20 नगरसेवक तसेच पत्रकार दिनाचे औचित्य साधुन शहरातील सर्व पत्रकरांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याचबरोबर शिवम कॉम्प्युटर यांच्या वतीने काढण्यात आलेल्या "वार्षिक दिनदर्शिका 2026" या दिनदर्शिकेचे प्रकाशनही या कार्यक्रमात करण्यात आले.या कार्यक्रमात नगराध्यक्ष बसवराज धरणे, नगरसेवक दत्तात्रय दासकर, नय्यर पाशा जहागीरदार, इमाम शेख, तानाजी जाधव,मारुती खारवे, आकाश कुलकर्णी, निरंजन राठोड,रिजवान काझी, ॲड. अरविंद बेडगे, छमाबाई राठोड, मन्नाबी कुरेशी, मीनाक्षीताई काळे, कमलबाई गायकवाड, राणी सुरवसे, सुमनबाई ठाकुर, साक्षी नळदुर्गकर यांच्यासह सर्व 20 नगरसेवकांचा व्यापारी मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर पत्रकार दिनाचे औचित्य साधुन नळदुर्ग शहरातील सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार व्यापारी मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे.यावेळी बोलतांना नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी म्हटले की. नळदुर्ग शहराच्या विकासाबरोबरच नळदुर्ग शहरातील व्यापार वाढावा यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातुन सर्व ते प्रयत्न करण्यात येतील. यासाठी बाजारपेठेत तसेच आठवडी बाजारच्या ठिकाणी स्वच्छता तसेच व्यापाऱ्यांसाठी मुलभुत सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचेही यावेळी नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी म्हटले आहे.यावेळी नगरसेवक दत्तात्रय दासकर, नय्यर पाशा जहागीरदार, तानाजी जाधव, मारुती खारवे, इमाम शेख यांनी बोलतांना नगरपालिकेच्या सभागृहात आम्ही सर्व 20 नगरसेवक शहर विकासासाठी प्रामाणिकपणे काम करुन शहरातील नागरीकांनी आम्हाला निवडुन देऊन जो आमच्यावर विश्वास दाखविला आहे त्याला तडा जाऊ देणार नसल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. डॉ.संतोष पवार यांनी केले तर आभार व्यापारी मंडळाचे मुकुंद नाईक यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शहर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष सतीश पुदाले, व्यापारी मंडळाचे सुभाष कोरे, दयानंद स्वामी,अजहर जहागीरदार, उमेश नाईक, सुधीर मोटे, संतोष मुळे, सोमनाथ कोरे, राजेंद्र महाबोले, राजेंद्र खद्दे, राजेंद्र पिचे,प्रभाकर घोडके, व्यापारी मंडळाच्या कल्पना गायकवाड, डॉ. आनंद काटकर, मारुती घोडके, प्रविण कासार यांच्यासह व्यापारी मंडळाच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमास शहरातील व्यापारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
