नळदुर्ग शहर राज्यात एक उत्कृष्ट असे पर्यटन स्थळ म्हणुन नावारूपास यावे यासाठी आपण ताकदीने प्रयत्न करणार आहोत :-आमदार राणाजगजितसिंह पाटील.

 

नळदुर्ग :- नळदुर्ग नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष बसवराज धरणे यांचा 29 डिसेंबर रोजी पदग्रहण सोहळा मोठया उत्साहात पार पडला. आमदार राणा जगजितसिंह पाटील, भाजपचे नेते सुनिल चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकनियुक्त नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्विकारला.प्रारंभी शास्त्री चौक ते नगरपालिका कार्यालयापर्यंत नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक यांच्यासह आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपचे नेते सुनिल चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, भाजपचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य नितीन काळे व नागरीक वाजत, गाजत व फटाक्यांच्या अतीषबाजीत मिरवणुकीने आले. यानंतर नगरपालिका कार्यालयात आमदार राणाजगजितसिंह पाटील व भाजपचे नेते सुनिल चव्हाण यांच्या उपस्थितीत नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष बसवराज धरणे यांना नगराध्यक्ष पदाचा पदभार दिला. यावेळी मोठ्या प्रमाणात शोभेची दारू उडविण्यात आली. यानंतर झालेल्या कार्यक्रमात शहरातील जेष्ठ नागरीक व लोकतंत्र सेनानी बलभिमराव मुळे, खंडेशा कोरे, सेवानिवृत्त सहाय्यक परीवहन अधिकारी नंदकुमार डुकरे यांच्यासह आमदार राणा जगजितसिंह पाटील, भाजपचे नेते सुनिल चव्हाण, युवानेते मल्हार पाटील. जि. प. च्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नितीन काळे यांनी नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्यासह सर्व नगरसेवकांचा सत्कार केला. यावेळी बोलतांना आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटले की, शहरवासियांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे काम करावे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या माध्यमातुन आपल्याला नवनवीन योजनांमधुन शहरात काम करुन शहराचा चेहरामोहरा बदलायचा आहे. निवडणुकीत आपण विकासाचे जे आश्वासन दिले आहे ते पुर्ण करण्यासाठी सर्वांनी एकदीलाने काम करणे गरजेचे आहे. येणाऱ्या पुढच्या दहा दिवसाच्या आत आम्ही पुढील 100 दिवसांचे काम ठरविणार आहोत. पर्यटनाच्या माध्यमातुन नळदुर्ग शहरात युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आपल्याला काम करायचे आहे. त्याचबरोबर नळदुर्ग शहराला तालुक्याचा दर्जा मिळावा यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर शहरात सध्या जी मोठी कामे सुरु आहेत ती लवकर पुर्ण व्हावे यासाठी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पाणीपुरवठ्यासह रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावेत यासाठी सर्वांनी लक्ष द्यावे त्याचबरोबर शहराच्या विकासासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असुन यासाठी प्रत्येक प्रभागात पाच जणांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.यावेळी दत्ता कुलकर्णी, नितीन काळे यांचीही भाषणे झाली. त्याचबरोबर यावेळी बोलतांना नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी म्हटले की, आमदार राणाजगजितसिंह पाटील व भाजपचे नेते सुनिल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना सोबत घेऊन नळदुर्ग शहरात विकासाची कामे करुन नळदुर्ग शहर विकसित करण्याचा प्रयत्न आम्ही करणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा सरचिटणीस साहेबराब घुगे, भाजपचे नेते सुशांत भुमकर, ॲड.दीपक आलुरे, दत्ता राजमाने, विलास राठोड, सिद्धेश्वर कोरे,भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस श्रमिक पोतदार,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, धीमाजी घुगे, पद्माकर घोडके,दमयंती महिला शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुभद्राताई मुळे, माजी नगरसेवक सुधीर हजारे, व्यापारी मंडळाचे सुभाष कोरे, मुकुंद नाईक यांच्यासह धाराशिव जिल्हा, तुळजापुर तालुका व नळदुर्ग शहरातील भाजप-शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगरपालिका कार्यालय फुलांनी सजविण्यात आले होते. त्याचबरोबर रंगीबेरंगी फुगे लावण्यात आले होते तसेच कार्यालयाचे प्रवेशद्वार व कार्यालय परीसरात सुंदर रांगोळी काढण्यात आली होती.

Post a Comment

Previous Post Next Post